muktiwad logo
Home Chandrapur बोगस करारनामा करणाऱ्या सिमेंट कंपनीच्या अधिकार्‍ यांवर गुन्हा दाखल करा.

बोगस करारनामा करणाऱ्या सिमेंट कंपनीच्या अधिकार्‍ यांवर गुन्हा दाखल करा.

0
26

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : बोगस बनावट खोटे करारनामा करुन विश्श्वात घात करुन फसवणुक केल्यामुळे व रात्री बुलडोझर लावुन आमचे घरे उद्ध्वस्त केल्यामुळे मानिकगड सिमेंट कंपनी व अट्रोटेक सिमेंट कंपनीचे अधिकारी मुकेश गहेलात, नविन कौशिक, राजेश झाडे व सचिन गोवारदिपे विरुव्द अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याबाबत. विनोद खोब्रागडे व संबधीत आदिवासी यांची पत्रकार परिषदेची मागणी केली.
चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यातील मौजा कुंसूबी व नौकारी येथील ६४३.६२ हे. आर जमीन दिनांक ३०/०४/१९७९ रोजी शर्ती व अटीनुसार महाराष्ट्र शासनाने में. मानिकगड सिमेंट कंपनीला चुनखडी उत्खन्नाकरती ५० वर्षाचा लिजवर दिली त्यापैकी कुंसूबीचा २४ आदिवासी यांची ६३.६२ हे. आर जमीन तेव्हा ही कंपनीला दिली नाही व आज ही नाही. पेसा गाव असल्यामुळे शासन मंजुरी देवू शकत नव्हती. मात्र जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी १९८५ मध्ये कलम जमीन महसुल कलम ४८ नुसार भुपृष्ट भाडे तत्वावर १२५००/- प्रति हेक्टर प्रमाणे कंपनीला वरचा भाग वापरण्यासाठी भाडयाने दिला. मात्र कंपनीने भाडयाने जमीन घेवुन कुठलाही मोबदला न देता अवैध उत्खन्न ४५ वर्षापासून करीत होते. तसेच मोठ्या प्रमाणात जंगल तोडून पर्यावरणाची परवानगी नसतांना मोठ्या प्रमाणात महसुल बुडवुन अवैध उत्खन्न करीत होते. आम्ही मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ नागपूर येथुन क्रिमिनल रिठ पिठीशन ६५७/२०२१ दाखल केली, न्यायमुर्तीने नोटीस इष्यु करताच कंपनीने बोगस करारनामा करुन अंगुठे घेवुन १० लाख प्रति एकर प्रमाणे जमीनीचा मोबदला व १० लाख घराचे देवून कायम स्वरुपी नौकरी देवुन असा करार केले त्या करारावर एकाही महसुल अधिकारी यांची स्वाक्षरी नाही असा बोगस करार करुन दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ वाजता बुलडोझर लावुन आमचे घरे उध्वस्त केले. व आमचे अंगुठे घेवुन आमच्या विश्वास घात केले त्यामुळे संबंधीत दोषी अधिका-यावर व दलाल भारत आत्राम यांचेवर कारवाई करण्याबाबत लेखी निवेदन जिल्हाधिकारी , चंद्रपूर व पोलिस अधिक्षक, चंद्रपूर यांना दिले आहे. निवेदन देतांना खालील शेतकरी उपस्थित होते. राजेश बापुराव आत्राम, बापुराव मारु जुमनाके, अय्यु भिा सिडाम, वासुदेव पांडू जुमनाके, परशुराम हिरामन आत्राम, निलकंठ देवराव आत्राम, किसन लोकीराम जाधव, खुशालमोतीराम पंधरे, सारजाबाई कोटनाके, कांताबाई आत्राम, लिंगु मारु येडमे, राजु सिडाम, सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here