muktiwad logo
Home Breaking News त्या वनविभागाची जमीन विकणाऱ्या राजोलीच्या वनपालावर कार्यवाहीचे संकेत नाही.

त्या वनविभागाची जमीन विकणाऱ्या राजोलीच्या वनपालावर कार्यवाहीचे संकेत नाही.

0
113

 

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : चंद्रपूर वन विभागा अंतर्गत येत असलेल्या सावली वनपरिक्षेत्रच्या राजोली उपक्षेत्राचे वनपाल हे वन विभागाच्या जमिनीला आपला आर्थिक स्वार्थ पूर्ण करण्याच्या हेतूने अधिनस्त असलेल्या वनरक्षकाला अथवा कोणत्याही कर्मचाऱ्याला कसल्याही प्रकारची माहिती न देता राजस्थानी ट्रॅक्टरवाल्या सोबत चार एकर जमीन साफ करून रातोरात  शेतीयोग्य जमीन करून देण्याचा हट्ट राजस्थानी ट्रॅक्टर मालकाला केले होते.  त्याला तीन – चार  गाड्या आणि जेसीबी लावून रातोरात चार एकर जमीन साफ करा. सोबत मी रात्रभर वन विभागाच्या पोशाखात असतो. तुम्हाला कोणीही अडवणार नाही . अशाप्रकारचे बोलने करून गट क्रमांक 136 मध्ये शेतकऱ्याला अतिक्रमण करण्यास राजोलीच्या वनपालाने सूट दिली होती. त्यानुषंगाने या प्रकरणाची बातमी मुक्तिवादने दिनांक 17/ 5 /2026 ला  प्रसारित केली. आणि चोहोबाजूंनी त्या वनपालावर थू थू झाले. ही वनविभागाकरिता शरमेची बाब असताना सुद्धा आणि  गंभीर प्रकरण असून सुद्धा  अधीकाऱ्यांनी आतापर्यंत पंधरा दिवसाचा काळ लोटूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नसल्याचे समजते. सदर प्रकरणात विभागीय वन अधिकारी कार्यालयामार्फतिने  त्या  अतिक्रमण धारकाला आणि  वनपालाला पाठबळ तर दिले नाही ना ? अशी शंका आता जनमानसात निर्माण झाली असून त्यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही न होणे ही आश्चर्याची बाब  मानल्या जात आहे. त्यामुळे मुख्य वन संरक्षक यांनी स्वतः जातीने लक्ष घालून त्या चोर वनपालाला कायद्याच्या चौकटीत आणणार का  ? आणि  निलंबित करणार का असा प्रश्न आता नागरिक करू लागले आहेत. सरकारची संपत्ती असूनही जर शासनाचेच  कर्मचारी  अशा प्रकारे उपद्रवी कृत्य करत असतील तर शासन सदर कर्मचाऱ्यांवर का म्हणून दर महिन्याला लाखोने खर्च करतो. ज्या देखभालीसाठी या कर्मचाऱ्यांना नियुक्त केल्या जाते. आणि कुंपणच शेते खाते तर यांची गरजच काय ?  रान मोकळे करून द्याव. वाटेल तो व्यक्ती जाऊन अतिक्रमण करेल. वाटेल तो व्यक्ती आपापल्यापरीने अवैध वृक्षाची तोड करेल.  शासनावर उगाच आर्थिक भुर्दंड कशाला ? अशाप्रकारचे उलट –  सुलटही प्रश्न आता नागरिक करू लागले आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here