चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : ग्रामविकास आघाडीचंद्रपूर जिल्ह्यातील मूल पंचायत समितीत येत असलेल्या ग्रामपंचायत जुनासुर्ला येथे मागील पाच वर्षापासून १५ वित्त आयोगामध्ये ८४ लाख ७५ हजार ६२०रुपयाच्या प्राप्त निधीतून लाखो रुपये हडपल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेतून शेतकरी, शेतमजूर ,कामगार ग्रामविकास आघाडी यांच्यावतीने करण्यात आला. ग्रामपंचायत येथे विकासाच्या नावावर विकास कामे न करता ग्रामपंचायत च्या कॅश बुक ला खर्चाची नोंद करून सचिव व सरपंचाने परस्पर लाखो रुपयांची विल्हेवाट लावून हडपल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून अध्यक्ष गंगाराम इंदूलवार, संदीप गिरडकर, साईनाथ गवार बुग्गावार, स्नेहल मडावी, रतन उराडे, यांनी दिली. या झालेल्या घोटाळ्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असून सदर विषयाची उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करून सचिव सरपंचाकडून शासनाचा निधी परत मागवून शासनाच्या खात्यात जमा करावा व शासनाच्या आदेशानुसार भ्रष्ट सचिव व सरपंचावर गुन्हे नोंद करावी अशी मागणी केली. संबंधित सचिवांनी विविध झालेल्या कामाची कुठलीही निविदा न काढताच कामे केल्याचा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात मूल पंचायत समिती येथील संवर्ग विकास अधिकारी यांना वारंवार तक्रारी देऊन सुद्धा कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप केला. पंधराव्या वित्त आयोगातील सौर ऊर्जेवर लघु, पाणीपुरवठा घोटाळा, गावातील नाली बांधकाम व सी सी रोड घोटाळा, खुल्या गटारावर सी सी कव्हर बसविणे, वासुदेव समर्थ, ते ताराबाई एडलावार येथील नाली बांधकाम न करताच लाखो रुपये उचलले, प्राथमिक आरोग्य केंद्र नळ कलेक्शन, फर्निचर खरेदी, व शोष खडा निर्माण करणे, घरगुती वैयक्तिक कचराकुंडी खरेदी घोटाळा, महिलांना शिलाई मशीन व प्रशिक्षण सेनीटायरीची पॅड वितरण करणे, विहीरीची तोंडी दुरुस्ती करणे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व अनुसंगीत कामे व इतर का साहित्य खरेदी बाबत घोटाळे . गुरुदेव सेवा मंडळ या साहित्य खरेदी सह १५ वित्त आयोगातील बांधकामे व साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात लाखोचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आज पत्रकार परिषदेतून करण्यात आला. संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून यात दोषी असणार्या कळक कारवाई करावी अशी मागणी केली. ग्रामपंचायतझालेल्या घोटाळा प्रकरणासंदर्भात ग्रामपंचायत अधिकारी यादव मिलमिले यांना विचारणा केली असता. ते म्हणाले की, मला जवळपास एक वर्षाचावर कालावधी झालेला आहे. माझ्या पूर्वी काही घोटाळे झाले असतील तर मला त्याची कल्पना नाही, मी त्यांनी मागितलेली माहिती पूर्णच माहिती अधिकारात दिली. त्यांनी केलेले आरोप खोटे असून कामे ई निविदा काढूनच करण्यात आले असल्याचे सांगितले.




