muktiwad logo
Home Chandrapur वारसा हक्क डावलून बोगस फेरफार केला – रंजना आसूटकर.

वारसा हक्क डावलून बोगस फेरफार केला – रंजना आसूटकर.

0
39

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा )  :  वारस हक्क डावलून बोगस फेरफार करून अन्याय केल्यामुळे संबंधित गजानन पंढरी लालसरे व इतर ५ विरूध्द फौजदारी कार्यवाही कारवाई करण्यात यावी अशी मागणी वरोरा येथील रंजना आसूटकर यांनी पत्रपरिषदेत केली. यामध्ये महसूल अधिकारी व भाऊ गजानन पंढरी लालसरे यांनी मिलिभगत केल्याचा आरोपही त्यांनी केली.
सविस्तर असे की, अर्जदार रंजना गणेश आसुटकर यांचे नांवाने कायदेशिर वारस हक्काने मौजा आशी येथील स.नं. २७० फेरफार कं. १४२४ प्रमाणे नाव दर्ज झालेले आहे. त्याप्रमाणे स.नं. ३०४, मध्ये सुध्दा अपिलार्थी रंजना गणेश आसुटकर यांचे नांव रेकार्डवर न चढविता परस्पर महसुल अधिकारी यांनी गजानन पंढरी लालसरे यांच्या सांगण्यावरुन कटकारस्थान व संगनमत करून विल्हेवाट लावलेली आहे. सदर प्रकरणामध्ये कोर्ट विद्यमान उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे न्यायालयात अपिल दाखल केली असता तिथे सुध्दा गजानन लालसरे व इतर यांनी महसुल अधिकारी यांचेशी संगनमत करून बोगस आदेश पारीत केलेला आहे व अपिलार्थीवर अन्याय केलेला आहे. ज्याअर्थी गैरअर्जदार गजानन पंढरी लालसरे यांचा वकिलामार्फत सर्वे नं. २७० प्रमाणे स.नं. ३०४ वर नाव चढविण्याची जबाबदारी ही तलाठी, मंडळ अधिकारी यांची असतांना त्यानी आपले कर्तव्यामध्ये कसुर केलेला आहे व नांव चढविले नाही ही त्यांची चुक आहे असे उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचे न्यायालयात लिहून दिलेले असतांना सुध्दा मा. उपविभागीय अधिकारी, वरोरा यांनी दि. ३०.४.२०२६ रोजी बोगस आदेश पारीत करून अपिलार्थीवर अन्याय केलेला आहे. त्याविरूध्द मा. कोर्ट विद्यमान अप्पर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे न्यायालयात अपिल प्रकरण कं. ६२/२०२६ दाखल केले असून सदर प्रकरणात दि. २०.५.२०२६ रोजी सुनावणी आहे. तरी अपिलार्थीची मागणी आहे की, सदर प्रकरणात सखोल चौकशी करून मुख्य आरोपी गजानन पंढरी लालसरे, मंगला गजानन लालसरे, मयंक गजानन लालसरे, तलाठी पांझुर्णी, मंडळ अधिकारी माढेळी व त्यांना सहकार्य करणारे नायब तहसिलदार, तहसिलदार वरोरा, व उपविभागीय अधिकारी, वरोरा यांचेवर सुध्दा कारवाई करावी व अपिलार्थीचे मोठया प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याबाबत आज पत्रकार परिषद घेवून दोषीवर कारवाई करण्याची मागणी करीत आहे तसेच सदर प्रकरणात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी आज पत्रकार परिषद मध्ये अपिलार्थी रंजना गणेश आसुटकर यांनी केलेली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद खोब्रागडे व रंजना यांचे पती गणेश आसूटकर यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here