( चंद्रपूर मुक्तिवाद सेवा ) : दिनांक १९/५/२६ रोजी पोलीस स्टेशन भद्रावती येथील भद्रानाग वार्ड भद्रावती येथे राहणारा प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्यावर छापा टाकून सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध पो.स्टे. भद्रावती येथे अप क्र. ५८९/२०२६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . दरम्यान
आरोपी आकाश अरुण सहारे वय ३१ वर्ष रा. भद्रावती जिल्हा चंद्रपूर
आणि पाहिजे असलेला आरोपी वैभव लांडे रा. सुमठाणा भद्रावती याचा शोध सुरू असून
मजा १०८ हुक्का प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचे ३८ खरड्याचे बॉक्स मध्ये ७६० टीनाचे सुगंधित तंबाखूचे डब्बे किमत प्रती बॉक्स २८५० रुपये प्रमाणे एकूण किंमत १०८३०० चा माल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई उपविभाग वरोरा पथक,
स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केले.




