muktiwad logo
Home Breaking News राजोलीच्या वनपालाने वनविभागाची जमीनच विकली . वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.

राजोलीच्या वनपालाने वनविभागाची जमीनच विकली . वन परिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.

0
517

 

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : चंद्रपूर वन विभागा अंतर्गत येत असलेल्या सावली वनपरिक्षेत्रातील राजोली उपक्षेत्राच्या वनपालाचा पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यापूर्वी मुक्तिवादने सदर वनपालाचे अनेक काळे कारणामे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला होता. राजोलीचे महाशय वनपाल हे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात आले असून त्यांनी चक्क वन विभागाच्या मालकीची जामीनच विकल्याची माहिती समोर आल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही प्रश्न निर्माण केल्या जात आहेत.

प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहितीनुसार फेब्रुवारी २०२६  मध्ये उपक्षेत्र राजोली अंतर्गत येत असलेल्या चिखली येथील शेतकऱ्याचा  वन विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण आहेच. मात्र पुन्हा फेब्रुवारी महिन्यात गट क्रमांक १३६ मधील रेल्वे लाईनला लागून असलेली वन विभागाच्या मालकीची चार एकर जमीन आपल्या अधीनस्त असलेल्या वनरक्षकाला सुद्धा कोणत्याच प्रकारची माहिती न देता संबंधित शेतकऱ्यासोबत आपल्या आर्थिक फायद्यासाठी हात मिळवणी करून वन विभागाची चार एकर जमीन वनपालाने विकली. नंतर शेतकऱ्याला सदर जमिनीवर ताबा करायचा असल्याने शेतकरी आणि वनपाल यांनी राजस्थानातून कामाच्या शोधात आलेल्या जेसीबी, ट्रॅक्टरच्या मालकांशी संपर्क करून रातोरात चार एकर जमिनीवर मशागत करण्याची बोलणी केली. मात्र सदरचे राजस्थानी मालकाने वन जमिनीची पाहणी केल्यानंतर ही जागा वनविभागाची वाटते. उद्या कार्यवाहीची बाब निर्माण झाल्यास आपलं नुकसान होईल. असे म्हणून नकार दिले असता , वनपालाने मी वर्दी घालून रात्रभर तुमच्या सोबत राहतो. मी वर्दीवर असल्याने तुम्हाला कोणीही अडवणार नाही. अथवा कसलीही अडचण निर्माण होणार नाही. काम एका रात्रीत झालं पाहिजे. वाटल्यास तीन चार ट्रॅक्टर आणि जेसीबी अधिकच्या लावून काम करा. मी रात्रभर वर्दीवर तुमच्या सोबत असतो असे बोलल्यानंतरही वाहन मालक सदरच्या कृत्यास तयार न झाल्याने बेत फसला. हळूहळू ही खबर वाऱ्यासारखी पसरली आणि या जमीन विक्रेत्याची पोल खूलली.

अशाप्रकारचा  गंभीर आणि मोठा गुन्हा असूनही आजपर्यंत त्या वनपालावर कोणतीच कार्यवाही झाली नाही. ही आश्चर्याची बाब असून संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह इतरही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर अनेक गंभीर प्रश्न नागरिकांकडून केल्या जात आहेत.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here