( चंद्रपूर मुक्तिवाद सेवा ) : दिनाक १८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना नागपूर शाखा, चंद्रपूरची महत्त्वपूर्ण सभा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सदर सभा रामानुजन मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. दरम्यान सभेमध्ये वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्या विविध समस्या व तक्रारींविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने लेखी निवेदन मुख्य वनसंरक्षक यांना सादर करण्यात आले. यावेळी मुख्य वनसंरक्षक रामानुजन यांनी सर्व समस्या व तक्रारींचा लवकरच निपटारा करून पूर्ण कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वस्त केले.
यावेळी भारत मडावी , चंद्रपूर वनवृत्त अध्यक्ष, विजय मोरे , वृत्त कार्याध्यक्ष, सिद्धार्थ मेश्राम, गडचिरोली वनवृत अध्यक्ष, पुनमचंद बुद्धावार , केंद्रीय पदाधिकारी, आनंद तिडके, नागपूर वृत्त अध्यक्ष, रवि बत्तलवार, वृत्त समन्वयक, अश्विनी आत्राम, वृत्त महिला प्रतिनिधी प्रमुख नरेश चापले, वृत्त कोषाध्यक्ष, प्रवीण बोभाटे, वृत्त सचिव, मिलिंद कीटे, वृत्त उपाध्यक्ष, प्रमोद पर्वतकर, वृत्त संघटक संदीप पारवे, अध्यक्ष चंद्रपूर वनविभाग, श्रीकृष्ण नागरे, अध्यक्ष ब्रह्मपुरी वनविभाग सुरेंद्र मंगाम, अध्यक्ष TATR बफर वनविभाग सुविनय सरकार, साबळे साहेब, निलेश टेकाम, अशोक गेडाम आणि चंद्रपूर वनवृत्तातील सर्व पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गडचिरोली वनवृत्तातील पदाधिकारी देखील सभेस उपस्थित होते.
संघटनेच्या वतीने मुख्य वनसंरक्षक यांच्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.




