चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : चंद्रपूर येथील सामाजिक, राजकीय व कर्मचारी संघटनांचा पुढाकार महाराष्ट्रात अनुसूचित जातींमध्ये अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण करून संविधानिक मूल्यांना धक्का देण्याचे कार्य सुरू असल्याचा आरोप करत, चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, चंद्रपूर यांच्या वतीने सोमवार दिनांक १८ में २०२६ रोजी दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत भव्य जिल्हास्तरीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत अनुसूचित जाती उपवर्गीकरण तत्काळ रद्द करण्यात यावे. भारतीय संविधानाच्या कलम ३४१ नुसार अनुसूचित जातींचे घटनात्मक संरक्षण अबाधित ठेवण्यात यावे.न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल असंवैधानिक व अन्यायकारक असल्याने समिती बरखास्त करण्यात यावी.सर्व अनुसूचित जातींच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आर्थिक व शैक्षणिक योजना राबविण्यात याव्यात.सदर धरणे आंदोलन चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय व कर्मचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व घटकांनी एकजूट कायम ठेवून सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक हक्कांच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीचे निमंत्रक अशोक टेंभरे, किशोर तेलतुंबडे, अनंत बाबरे, राजकुमार जवादे आणि प्रा. नितीन रामटेके यांनी केले आहे. पत्रकार परिषदेला प्रवीण खोब्रागडे, देशक खोब्रागडे, बंडू ठेंगरे, अशोक फुलझेले, धर्मेश निकोसे, सुरेश नारनवरे, सुरेंद्र रायपुरे, जितेंद्र डोहाणे, प्रतीका होलीकर, अँड. राजस खोब्रागडे, तनुजा रायपुरे, प्रेरणा करमरकर, गीता रामटेके, निर्मला नगराळे, हर्षल खोब्रागडे, युगाण दवले आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सदर धरणे आंदोलनामध्ये समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्ष खोरीपा, चंचित बहुजन आघाडी, बी. एस. पी., रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बी आर एस पी, भीम आर्मी, डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर अयंती महोत्सव समिती, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, असोसिएशन ऑफ बुद्धिस्ट मेडिकोस, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशन, रिपब्लिकन स्टूडेंट फेडरेशन इंडिया, भीम शक्ती संघटना, भारतीय सुदर्शन समाज महासंघ, सर्व सामाजिक संघटन बौद्ध विहार बमंडळे, खाटिक समाज संघटना राष्ट्रीय चर्मकार संघ जिल्हा परिषद कर्मचारी संघटना कृती समिती या विविध संघटनांचा समावेश राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.




