चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी, वणी व वणी नॉर्थ क्षेत्रातील माती व कोळसा उत्खनन करणार्या कंत्राटी कंपन्यांमध्ये जिल्ह्यातील अनुभवी व स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे, बाहेरील कामगारांची अनियंत्रित भरती थांबविण्यात यावी तसेच कंत्राटी कंपन्यांकडून सुरू असलेल्या मनमानीला आळा बसावा, यासाठी येथील स्थानिक कामगार आंदोलन आमरण उपोषण करीत होते. या आंदोलनाची दखल घेत उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या नेतृत्वात वेकोलि अधिकार्यांची बैठक झाली. यामध्ये जिल्हाधिकार्यांनी स्थानिकांना नोकरीत पहिले प्राधान्य द्यावे असा आदेश पारित केला. परंतू वेकोलि अधिकार्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत आदेश धुडकावून लावला.त्यामुळे स्थानिक कामगारांना कामापासून वंचित राहावे लागले. वेकोलिच्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात १ जुन पासून दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्थानिक कामगारांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले असून स्थानिकांना डावलण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याची माहिती त्यांनी आज २९ मे रोजी झालेल्या पत्रपरिषदेत दिली.
वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, माजरी, वणी व वणी नॉर्थ क्षेत्रातील माती व कोळसा उत्खनन करणार्या कंत्राटी कंपन्यांमध्ये जिल्ह्यातील अनुभवी व स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य मिळावे, बाहेरील कामगारांची अनियंत्रित भरती थांबविण्यात यावी तसेच कंत्राटी कंपन्यांकडून सुरू असलेल्या मनमानीला आळा बसावा, या न्याय्य मागण्यांसाठी मागील दोन वर्षापासून सातत्याने निवेदने, आंदोलन, धरणे, पदयात्रा तसेच आमरण उपोषण करण्यात आले आहे.दि. ५ मे रोजी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त, माजी आमदार वामनराव चटप तसेच वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडचे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. सदर बैठकीमध्ये उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगारामध्ये प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. विशेष बाब म्हणजे, वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडचे संबंधित अधिकारी स्वतः बैठकीत उपस्थित असतानाही आजपर्यंत त्या निर्देशांची कोणतीही प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. यावरून वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासनाकडून प्रशासनाच्या निर्देशांची जाणीवपूर्वक अवहेलना व पायमल्ली करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
तसेच दि. १५मे रोजी झालेल्या बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी महोदयांनी स्वतः पुढाकार घेऊन वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक हेमंत शरद पांडे यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली व स्थानिक बेरोजगारयुवकांच्या रोजगार प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच दि. २० मे पर्यंत स्थानिक बेरोजगार युवकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात जमा करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. जिल्हाधिकारी महोदयांच्या निर्देशांचा आदर ठेवून कामगारांनी दि. १८ मे रोजी स्थानिक बेरोजगार युवती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र तसेच केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे अधिकृतरित्या सादर केली परंतु अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, आजपर्यंत वेकोलि प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करा आलेली नाही.यावरून असे स्पष्टपणे दिसून येते की, जिल्हाधिकारी महोदयांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेची व दिलेल्या निर्देशांची वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड प्रशासनाकडून जाणीवपूर्वक पायमल्ली करण्यात येत आहे. तसेच वारंवार आश्वासने देऊन स्थानिक बेरोजगार युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप कामगारांनी पत्रपरिषदेत केला.
विशेष म्हणजे, वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणार्या कंत्राटी कंपन्यांमध्ये आजही स्थानिक युवकांना डावलून बाहेरील कामगारांकडून कमी मजुरीत अधिक काम करून घेतले जात आहे. अनेक ठिकाणी कामगार कायदे, सुरक्षा नियम, वेतन नियम व श्रमिक हक्कांचे उल्लंघन सुरू असूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही कठोर कारवाई होतान दिसत नाही.
बॉक्समध्ये घेणे
सदर मागणीमध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी दिलेल्या निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अनुभवी तथा स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार देण्याबाबत स्पष्ट लेखी आदेश व कालमर्यादा जाहीर करण्यात यावी, वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अंतर्गत माती व कोळसा उत्खनन करणार्या कंत्राटी कंपन्यांची संयुक्त चौकशी करण्यात यावी, आम्हाला आणि स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगार देण्याबाबत वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेडला सक्तीचे आदेश जारी करण्यात यावेत, जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशांचे पालन न करणार्या संबंधित वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड अधिकार्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, ठेका संपल्यानंतर जुन्या कामगारांना हटवून नवीन कामगारांची भरती करून त्यांच्या हक्कांवर गदा आणण्याची पद्धत तात्काळ बंद करण्यात यावी, ७ प्रिंसीपल एम्प्लाईज म्हणून वेकोलिची जबाबदारी, स्थानिकांना डावलून बाहेरील कामगारांकडून कमी मनुरीत अधिक काम करून घेतले जात असताना वेकोलि कडून हस्तक्षेप का झाला नाही, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर पुग्नुससारख्या प्रदूषणग्रस्त भागातील बेरोजगारांना रोजगार बी.आर.एन. कंपनीने नाकारण्यामागे कोणते धोरण आहे? स्थानिकांना प्राधान्य का दिले जात नाही? यासारख्या अनेक मागण्यांचा समावेश आहे.
बॉक्समध्ये घेणे
आंदोलनाची दिशा
२ जुन रोजी मुंडल आंदोलन, ३ जुन रोजी निषेध आंदोलन व प्रशासन जागृती कार्यक्रम, ४ जुन रोजी काळ फासून निषेध आंदोलन, ५ जुन रोजी अर्धनग्न आंदोलन व ६ जुन रोजी परिवारासह व्यापक आंदोलन यांचा समावेश राहणार आहे.पत्रपरिषदेला रोशन हरबडे, सुशांत गुरनुले, रविंद्र ताजने, सोहेल शेख व इतरांची उपस्थिती होती.
Home Chandrapur वेकोलिने स्थानिक कामगारांना डावलल्याने १ जुनपासून आंदोलनाला सुरुवात – पत्रपरिषदेतून माहिती.




