चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : काल दि.१६/०५/२०२६ रोजी गुप्तबातमीदार यांचेकडुन मिळालेल्या माहितीवरून रिलॅक्स हॉटेल रूम अँड लॉजिंग वडगांव चंद्रपूर हस्तक नावाचा व्यक्ती हा हॉटेलमध्ये दोन ते तीन महिलांकडुन वेश्याव्यवसाय करवुन घेत आहे. अशा माहितीनुसार सदर प्राप्त माहितीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये विशेष पोलीस अधिकारी अमोल काचोरे पोलीस निरीक्षक यांचे नेतुत्वात बनावट गि-हाईक पाठवुन महिला पंच, सोशल वर्कर व अनैतिक व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर येथील स्टॉफसह धाड केली असता आरोपी सावजी पांडुरंग हस्तक, वय ७४ वर्ष, रा.डॉ. पंजाबराव देशमुख डी.एड कॉलेज समोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह रोड, वडगांव ता.जि. चंद्रपूर व पाहिजे असलेला आरोपी प्रदिप सावजी हस्तक वय ३० वर्ष रा. वडगाव चंद्रपूर हे दोघे दोन पिडीत महिलाकडुन वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाल्याने अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अन्वये पंचनामा कार्यवाही करण्यात आली. आरोपीकडुन मोबाईल रोख रक्क्म, कंडोम बॉक्स, रजिस्टर आणि क्यु आर कोड असा एकुण ७४००/- रू चा माल जप्त करण्यात आला असुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले. दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे. आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर करीत आहे.
सदरची कार्यवाही आयुष नोपानी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात अमोल काचोरे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतुत्वात संतोष निंभोरकर पोलीस उप निरीक्षक, सुनिल गौरकार पोलीस उप निरीक्षक, धनराज करकाडे, चेतन गज्जलवार, दिपक डोंगरे, कर्तिक खनके, १२३९ किशोर वाकाटे, ८८७प्रफुल्ल गारघाटे, २८५१ सुमित बरडे, २३५२ छाया निकोडे, १५२२ निराशा तितरे, २३६८ विजयमाला वाघमारे, २८३५ अपर्णा मानकर, चालक प्रमोद डंभारे, मिलिंद टेकाम, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.
अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे अमोल काचोरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी दिले आहे.




