चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : ग्रामदर्शन शिक्षण मंडळ चंद्रपूर र.नं. एफ १६८ (चं) या पंजिबद्ध संस्थेचा अनधिकृतपणे कारभार करणारे अशोक हरीभाऊ रणदिवे आणि वामन विठोबा नन्नावरे यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या कारभारावर प्रतिबंध घालण्याची मागणी मंडळाचे हयात असलेले एकमेव सदस्य वसंत जागोबा नागोसे यांनी पत्रपरीषदेतुन केलेली आहे. संस्थेची स्थापना १९७१ ला करण्यात आली. शेवटचा बदल अर्ज क्र. १६५/१९८० अन्वये दि. १६ मे १९८० रोजी सह धर्मदाय आयुक्त नागपूर यांनी पारीत केला. त्या परिशिष्ट १ वरील नागोसे हे एकमेव हयात असलेले सदस्य आहे. परिशिष्ट १ वरील अध्यक्ष हरिभाऊ धोंडबाजी रणदिवे हे दि. ८ फेब्रुवारी २००२ ला मरण पावल्याने त्यांचा मोठा मुलगा अशोक हरिभाऊ रणदिवे हा स्वतःला अध्यक्ष समजून संस्थेच्या रेकार्डचा वापर करून अनधिकृतपणे कारभार करीत आहे. संस्थेच्या सार्वजनिक हितास बाधा पोहचवत आहे. अशोक रणदिवे यांनी गैरकानुनी लोकांना हाताशी धरून सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांचेकडे अनेक बदल अर्ज दाखल केले परंतु आजतागायत त्यांचा एकही बदल अर्ज मंजूर झालेला नाही एवढेच नाही तर त्यांनी शेवटचा बदल अर्ज क्र. २२८०/२०१८ निर्णय दि. १३ फेब्रुवारी २०२४ मध्ये ते संस्थेचे साधे सदस्य नसल्याचे नमुद करण्यात आलेले आहे. यावर त्यांनी सह. धर्मदाय आयुक्त नागपूर यांचेकडे अपील दाखल केलेली होती, परंतू ती अपिल फेटाळण्यात आलेली आहे. त्यामुळे ते अध्यक्ष म्हणून कारभार करणारे कोणीही नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेने तसेच ग्रामदर्शन विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय खडसंगी ता. चिमुर येथील कर्मचारी आणि अधिकार्यांनी त्यांचे सोबत कोणताही व्यवहार करू नये, केल्यास भविष्यात कायदेशिर अडचणी निर्माण झाल्यास व्यवहार करणारे दोषी असतील असा इशाराही देण्यात आला.
याबाबत लेखी तक्रार पोलीस स्टेशन चिमुर येथे दि. २७ मे २०२६ ला देण्यात आलेली आहे. काही सेवाभावी लोकांच्या सहकार्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांचेकडे योजना दाखल केलेली असून ती प्रलंबीत असल्याची माहीती नागोसे यांनी पत्रपरिषदेत दिलेली आहे.
Home Chandrapur पंजिबद्ध संस्थेचा अनाधिकृतपणे कारभार करणार्यांवर गुन्हे दाखल करा – वसंत नागोसेची पत्रपरिषदेत...




